पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना.
बुलढाणा: पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट गावात ४ एप्रिलला घडली.
अंजली भरत शेजोळ असे तिचे नाव आहे. ती तोल जाऊन विहिरीत पडल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत तिला प्रथम बुलढाणा, नंतर छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी ५ एप्रिलला बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले.
Web Title: Death of a child after falling into a well
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App