अहमदनगर: जमिनीच्या वादातून अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याने एकाच मृत्यू
Breaking News | Ahmednagar: जमिनीच्या वादातून मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.
नेवासा: जमिनीच्या वादातून मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे ही घटना घडली. यापक्ररणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर गणेश अर्जुन आव्हाड (वय ३५, रा. महालक्ष्मी हिवरे) असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी गणेश अर्जुन आव्हाड यांच्या मावशीचे व मारुती मोहन सानप, शहादेव कारभारी सानप, (रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) यांचे जमिनीवरून एकमेकांचे वाद होते.
दरम्यान घरासमोर मोटारसायकलमधून बाटलीमध्ये पेट्रोल काढत असताना आरोपींनी मागील वादाच्या कारणावरून तसेच मावशी व आरोपी यांच्यातील जमिनीच्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी हातातील प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल अंगावर पडले असता, आरोपी मारुती मोहन सानप याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील काडीपेटीने पेटून दिले.
अशी फिर्याद उपचार घेत असताना गणेश अर्जुन आव्हाड (वय ३५, रा. महालक्ष्मी हिवरे) यांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मारुती मोहन सानप, शहादेव कारभारी सानप, (रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात होता.
मात्र फिर्यादी पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना शुक्रवारी दि.१२ जुलै रोजी मयत झाले. त्यानंतर या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहेत .
Web Title: death due to a land dispute after petrol was poured on his body and set on fire
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study