लाडक्या बहीणींना महिन्याला 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार?
Maharashtra Assembly Election 2024: महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जावी, अशी मागणी आपण सरकारमध्ये आल्यावर करणार असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले.
BJP Ravi Rana: महायुती सरकारने राज्यभरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवली. या योजनेचा आतापर्यंत कोट्यवधी महिलांना लाभ मिळाला आहे. राज्यात 2 कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात.सध्या राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे ही योजना तूर्तास थांबवण्यात आली आहे.
अशात योजनेबाबत महायुतीमधील एका बड्या नेत्याने मोठं वक्तव्य केलंय.निवडणुकीनंतर या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 3 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जावी, अशी मागणी आपण सरकारमध्ये आल्यावर करणार असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले आहेत.
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील योजनेबाबत काल मोठं भाष्य केलं. “लोकसभेला संविधान बदलण्याचा नेरिटीव्ह सेट केला. यामुळे आम्हाला मते मिळाली नाही. आम्ही चुकलो होतो, पण आमच्या लक्षात आल्यावर आम्ही सुधारलो ना, म्हणून 2 कोटी 30 लाख लाडक्या बहिणींना लाभ दिला. बहिणींनी आम्हाला राखी बांधली म्हणून आम्ही ओवाळणी दिली.” असं म्हणत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असं आश्वासन दिलं.
“राज्यातील लाडक्या बहीणींना 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीऐवजी 3000 रुपयांची आर्थिक मदत झाली पाहिजे. मी ज्या गरीबीतून या ठिकाणी पोहचलो ते मी विसरलो नाही. गरीबीची जाण मला आहे. मी सरकारमध्ये बसल्यावर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 3 हजार रुपयांची आर्थिक मदत करा, अशी मागणी करेल.”, असं रवी राणा म्हणाले. आता महायुती सरकार पुन्हा एकदा येणार का? आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना योजनेचे खरंच 1500 ऐवजी 300 रुपये मिळणार का?, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Web Title: Dear sisters will get Rs 3000 if not 1500 per month
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study