Home धुळे नववीतील मुलीचा गोणपाटात मृतदेह आढळला

नववीतील मुलीचा गोणपाटात मृतदेह आढळला

Breaking News: नववीतील मुलीचा गोणपाटात मृतदेह आढळला.

dead body of the ninth grade girl was found in a sack

शिंदखेडा | धुळे: तालुक्यातील एका गावातून नववीत शिकणारी १४ वर्षीय मुलगी ५ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दादरच्या शेतात एका गोणपाटात आढळून आला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शिंदखेडा तालुक्यातील एका गावात नववीत शिकणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ५ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याच गावात एका शेतात रविवारी दुपारी मजूर दादर कापणीचे काम करीत असताना त्यांना शेतात पडलेल्या गोणपाटातून उग्र वास येऊ लागला. मजुरांनी गावात धाव घेत, पोलिस पाटलांना घटनेची माहिती दिली.

पाटलाने शिंदखेडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपक पाटील, पनिरीक्षक मिलिंद पवार, एकलाख पठाण, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कुंदन पवार घटनास्थळी पोहोचले. र्वांच्या उपस्थितीत गोणपाट फाडून पाहिले असता, त्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. हा तपाताचा प्रकार असल्याचा संशय असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. घटनास्थळी पविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनीही भेट दिली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह ामीण रुग्णालयात आणण्यात आला. घटनास्थळी ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ाप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिंदखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: dead body of the ninth grade girl was found in a sack

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here