संगमनेर: विहिरीत कोसळलेल्या पिकअप चालकाचा मृतदेह सापडला; मात्र मृतदेह……
Sangamner News: विहिरीमध्ये अडकलेला पिकअप चालकाचा मृतदेह (Dead body) शोधण्यात प्रशासनाला ३० तासांच्या प्रयत्नानंतर यश.
संगमनेर : वाळूची बेकादेशीर वाहतूक करणारी पिकअप खोल विहिरीत कोसळल्याची घटना शनिवारी (दि.२५) पहाटे चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ गावालगतच्या काटवण मळा परिसरात घडली होती. विहिरीमध्ये अडकलेला पिकअप चालकाचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला ३० तासांच्या प्रयत्नानंतर यश आले आहे. या घटनेतील पिकअप चालकाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे उशिरापर्यंत वाहन चालकाचा मृतदेह शवागृहात पडून होता.
वाळूची बेकादेशीर वाहतूक करणारी पिकअप खोल विहिरीत कोसळल्याची घटना शनिवारी (दि.२५) पहाटे चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ गावालगतच्या काटवण मळा परिसरात घडली होती. या वाहनामध्ये बसलेले ४ मजूर बचावले होते, तर पिकअप चालक विहिरीत अडकला होता. बचाव पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतर काल रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पीकअप चालकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. गोरख नाथा खेमनर (वय २३, रा. डिग्रस, ता. संगमनेर), असे पिकअप चालकाचे नाव आहे. घटनास्थळी काल सकाळी मोठी गर्दी जमा झाली होती. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेतील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा या चालकाच्या नातेवाईकांनी घेतला होता. मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी तो पीकअप मालकाच्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरल्याने घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. मोठ्या प्रयत्नानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मृतदेह रुग्णवाहिकेतून संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. या ठिकाणीही नातेवाईकांनी गर्दी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.
Web Title: Dead Body of pickup driver found stuck in well
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App