ब्रेकिंग न्यूज! बेपत्ता तरुणाचा कालव्यात आढळला मृतदेह
Breaking News Ahmednagar: चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह (Dead body) वाकडीतील श्रीरामपूर रस्त्यावर गोदावरी कालवा पुलालगत आढळून आल्याने खळबळजनक.
श्रीरामपूर: राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह वाकडीतील श्रीरामपूर रस्त्यावर गोदावरी कालवा पुलालगत आढळून आल्याने खळबळजनक उडाली आहे.
सचिन हरिभाऊ घोगळ (वय ३०) असे या युवकाचे नाव आहे. हा युवक सोमवारी रात्रीपासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याची फिर्याद राहाता पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. परंतु शुक्रवारी दुपारी एक वाजेदरम्यान कालव्याच्या लगत असलेल्या वाकडीतील अण्णाभाऊ साठेनगर मधील युवक गोरख विश्वनाथ खरात, अजय खरात व सोमनाथ खरात कालव्या नजिक असलेल्या रस्त्याने जात असतानाच त्यांना एक पुरुष जातीचा मृतदेह कालव्यामध्ये तरंगताना आढळून आला. त्यांनी पोलीस पाटील मच्छिंद्र अभंग यांना कळविले. त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये माहिती कळविली.
दरम्यान ही माहिती त्यांचे चुलतभाऊ नितीन घोगळ यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह सचिन याचा असल्याचे त्यांनी सांगितले. हा मृतदेह श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये आढळल्याने तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षिक दरशथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, पो.हे.कॉ. मोहन शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
Web Title: Dead Body of missing youth found in canal
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News