संगमनेर तालुक्यात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील वरुडीपठार शिवारातील संजय दगडू फटांगरे यांच्या शेताजवळ असलेल्या चारीत एका अनोळखी स्त्री जातीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (Dead body) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हा प्रकार सोमवार (ता. २७) उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वरुडीपठार शिवारात संजय फटांगरे यांची शेती आहे. शेतीजवळच चारी असून त्यात सोमवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा अंदाजे वय ६५ ते ७०) कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वरूडी पठार गावच्या पोलीस पाटील स्वाती जाधव यांनी घटनेची माहिती तत्काळ घारगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यवाही केली. याप्रकरणी पोलीस याबाबत घारगाव पाटील स्वाती जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेडकॉन्स्टेबल गांधले हे करत आहे.
Web Title: Dead body of an unidentified woman was found rotting in Sangamner taluka