अहमदनगर ब्रेकिंग: रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
Ahmednagar | Shrirampur News: वाकडी रस्त्याच्या जवळ एका तरुणाचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर एमआयडीसी येथील वाकडी रस्त्याच्या जवळ एका तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
सदर मृतदेहाच्या अंगात लाल रंगाचे स्वेटर, पांढर्या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची जीन्स, पायात स्पोर्टस् बूट, परिधान केलेले आहे. सदर मृतदेहच्या तोंडावर कोणत्या तरी टणक वस्तूने जोरात मारल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. त्यामुळे चेहरा छिन्नविच्छिन्न झालेला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी पथकासह दाखल झाले असून पुढील तपास करत आहे. दरम्यान श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली भोर (यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. तसेच बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह याच परिसरात टाकण्यात आला होता. आता पुन्हा याच भागात मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
Web Title: Dead body of a young man was found on the side of the road
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App