अहमदनगर: बंधाऱ्यात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात?
Ahmednagar | Koapragaon News: बाजारतळ परिसरात त्याच जांभूळ नाळ्यात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह (Dead body) तरंगताना काही नागरिकांना दिसून आला.
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथील जांभूळ नाळा नदीपात्रात नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारी रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह (Dead body) आढळून आला होता.
त्या मृतदेहाची ओळख पटवून शिर्डी पोलिसांनी घातपाताचा कट उघड करत आरोपींना जेरबंद देखील केले. या घटनेला दहा दिवस उलटले तोच बुधवारी सकाळी बाजारतळ परिसरात त्याच जांभूळ नाळ्यात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना काही नागरिकांना दिसून आला. ही माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला समजतात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस नाईक मकासरे अदी घटनास्थळी दाखल झाले. याच नाल्यातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सदर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी स्थानिक नागरिकांना आवाहन केले असता हा मृतदेह गावातीलच असल्याचे सांगण्यात आले. राजेंद्र चांगदेव औताडे व मृत व्यक्तीच्या आईने हा मृतदेह संदीप सोपान गडाख यांचाच असल्याचे खात्रीशीर सांगितले. साधारण दोन ते तीन दिवसापासून मृत व्यक्ती घरी आली नसल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
बुधवारी सकाळीच या व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचा आढळून आल्याने हा घातपात (Murder), अपघात की आत्महत्या (Suicide) याचा उलगडा करणे शिर्डी पोलीस स्टेशन समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. अधिक तपास पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करीत आहे.
Web Title: Dead body of a young man was found in the embankment, suicide or accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App