संगमनेरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ
Sangamner Found Dead Body: तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ.
संगमनेर: शहरातील नवीन नगर रोड वरील कुटे हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत आज मंगळवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
सदर ठिकाण हा मृतदेह आढळून आल्याने शहर पोलीसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतदेह ताब्यात घेत त्याची ओळख पटविण्यासाठी सर्वत्र खबर दिली. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली असून किरण सुर्यभान कडलग ( वय ३०, रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) असे मयताचे नाव असल्याचे पोलीसांनी सांगीतले. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह ( त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदर इसमाचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन उगले करत आहे.
Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम
Web Title: Dead body of a young man was found in Sangamner
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App