Home क्राईम खळबळजनक: फ्लॅटमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह,  लव्ह मॅरेज अन…

खळबळजनक: फ्लॅटमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह,  लव्ह मॅरेज अन…

Pune Crime: एका बंद फ्लॅटमध्ये तरुण जोडप्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ, त्यांची आत्महत्या की हत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू.

Dead bodies of husband and wife found tied in flat, love marriage

पुणे: पुण्यात लोहगाव येथे एका बंद फ्लॅटमध्ये तरुण जोडप्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघे दाम्पत्य येथे एका इमारतीत भाड्याने राहत होते. त्यांचा मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याने या घटनेचा उलगडा झाला. पोलिस घटनास्थळी गेल्यावर दोघांचेही मृतदेह हे बेडवर बांधले अस्लयचे दिसले. यामुळे त्यांची आत्महत्या की हत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप माहिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकररणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातल्या बंद फ्लॅटमध्ये तरुण जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. किरण आणि आरतीच्या लग्नाला काही महीने पूर्ण झाले होते. त्यांनी लव्ह मॅरेज केले होते. पुण्यातल्या लोहगाव भागात ही घटना घडली आहे. २३ वर्षांचा तरुण आणि त्याची २१ वर्षांची पत्नी असे दोघेजण लोहगाव येथील इमारतीत भाडे तत्त्वावर राहात असलेल्या त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांचे मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. डबल बेडवर हात बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली.

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहगाव येथील एका सोसायटीतून एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती सोमवारी (दि ५) पोलिस कंट्रोलरूमला मिळाली. त्यांनी ही माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिस सकाळी ११ च्या सुमारास घटनास्थळी पोहचले. त्यांनी दरवाजा वाजवला असता यातून कुणी प्रतिसाद दिला नाही. दोन तीन दिवसांपासून दरवाजा उघडला नसल्याचे सोसायटीत राहणाऱ्या काही नागरिकांनी सांगितले. दरम्यान, फ्लॅट मधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला. पोलिस आत गेले तेव्हा तेथील दृश भयावह होते. दोघांचेही मृतदेह बेड वर पडून होते. तसेच त्यांचे हात पाय बांधले होते, असे विमानतळ पोलीसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांचे मोबाइल ताब्यात घेतले असून त्याच्यावरून प्राथमिक तपास केला जात आहे.

Web Title: Dead bodies of husband and wife found tied in flat, love marriage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here