रक्षाबंधनाच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने 3 जणांचा मृत्यू, गावावर शोककळा
मंदिरावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
वर्धा: मंदिरावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात बुधवारी सकाळी आठ वाजेच्या च्या सुमारास ही घटना घडली. अशोक सावरकर(55), बाळू शेर (60) व सुरेश झिले (33) अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण गावातील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते. मंदिराच्या झेंड्याचा खांब जवळपास 25 फूट उंच होता. मंदिरावर झेंडा लावताना अचानक खांब कलंडला आणि शेजारून जाणाऱ्या 33 केव्ही विजेच्या तारेवर पडला. यामुळे अशोक सावरकर, बाळू शेर व सुरेश झिले या तिघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. ते तिघेही मंदिराच्या शेडवर पडले. 3 पैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावात हर्षोल्हासाचे वातावरण होते. त्यात सकाळीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे.
Web Title: day of Raksha Bandhan, 3 people died due to an electric shock
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App