Home संगमनेर संगमनेर: बिबट्याला पकडण्यासाठी रात्रंदिवस शोध मोहीम मात्र बिबट्या अडकेना

संगमनेर: बिबट्याला पकडण्यासाठी रात्रंदिवस शोध मोहीम मात्र बिबट्या अडकेना

Breaking News | Sangamner: रात्रंदिवस संपूर्ण परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू.

Day and night search mission to catch the leopard

संगमनेर: तालुक्यातील देवगाव परिसरातातील पानोबा वस्ती येथे महिलेल्या ठार केलेल्या बिबट्याचा (Bibatya) बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने शोधमोहीत हाती घेतली आहे. यासाठी 14 पिंजरे, 6 पथके, 3 शूटर, 3 थर्मल ड्रोन, 3 ट्रॅप कॅमेरे आणि शंभर अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस शोध घेत आहे. मात्र तरीही बिबट्या हाती लागत नसल्याने भीतीचे वातावरण कायम आहे. मका कापत असताना योगिता पानसरे या महिलेवर बिबट्याने हल्ला करत ठार केले होते. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले.

यानंतर खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यावरुन वन विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर असून देवगाव, खराडी, निमगाव टेंभी या संपूर्ण परिसरात बिबट्याची शोधमोहीम सुरू केली असून चौदा ठिकाणी पिंजरे लावले आहे. तर पुणे , नाशिक, संगमनेर अशी एकूण सहा पथके बिबट्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे तीन शूटर देखील आहेत. रात्रीच्या वेळी तीन थर्मल ड्रोनव्दरे बिबट्यावर वॉच लक्ष ठेवून आहेत. तसेच तीन ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहे. याचबरोबर शंभर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी काम करत आहे.

रात्रंदिवस संपूर्ण परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच पुन्हा बिबट्या परिसरात दिसला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. मात्र तरीही बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे.

Web Title: Day and night search mission to catch the leopard

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here