Home क्राईम सुनेचा विनयभंग प्रकरणी भाजप नेत्याला अटक

सुनेचा विनयभंग प्रकरणी भाजप नेत्याला अटक

 

Daund BJP leader arrested in molestation caseदौंड | Daund: माहेरून पैसे आणण्यासाठी सूनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी दौंड तालुक्याचे भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे माजी सरचिटणीस तानाजी दिवेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्याबरोबरच घरातील  मुलगा, बायको आणि दुसऱ्या मुलालाही करण्यात आली आहे.

या पिडीत महिलेने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून सासरे तानाजी दिवेकर यांनी दमदाटी केली. लग्नाचा खर्च मागितला, शिवीगाळ केली तसेच विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

तानाजी दिवेकर यांचा मुलगा पंकज दिवेकर यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच पीडित विवाहितेला तिच्या वडिलांचा गोठा आपल्या नावी करावा असे सांगण्यात आले. याप्रकरणी दोनही कुटुंबात चर्चा, बैठका झाली मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. हे कुटुंब पिडीतेला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने या विवाहितेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Daund BJP leader arrested in molestation case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here