Home अकोले अकोले: प्रेमविवाहास आईचा विरोध आईसह मुलीची आत्महत्या

अकोले: प्रेमविवाहास आईचा विरोध आईसह मुलीची आत्महत्या

Akole News:  प्रेमविवाहास आईचा विरोध असल्याने मुलीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या (Suicide).

Daughter's suicide with mother's opposition to love marriage

अकोले: प्रेमविवाहास आईचा विरोध असल्याने मुलीने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात बहिणीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन मुलींच्या मृत्यूनंतर आईनेही घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अकोले तालुक्यातील मन्ह्याळे येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून अकोले हादरलं आहे. मन्याळे शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली.  आत्महत्येमुळे मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे. सुनिता जाधव (वय 48), प्राजक्ता जाधव (वय 22) आणि शितल जाधव ( वय 18) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकारामुळे गावात शोककळा पसरली

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भाचा संदीप नंदराज डोळसच्या फिर्यादीनुसार आपल्या घरासमोरच मामी सुनिता अनिल जाधव राहत होत्या. मामा अनिल जाधव यांचा २०१० मध्ये मृत्यू झाला आहे. धाकटी मुलगी शीतलने १४ फेब्रुवारीला जुन्नर येथे तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यास मामीचा विरोध होता. तसे त्यांनी तरुणालाही सांगितले होते. आईच्या विरोधानंतरही शीतल बुधवारी पतीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात शीतल शेतात गेली, तिला बोलावण्यासाठी थोरली मुलगी प्राजक्ताही मागून गेली. मात्र, बराच वेळ होऊनही दोघी न परतल्याने सुनीताही शेतात गेल्या. त्यानंतर पुन्हा घरी येऊन त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून अकोले हादरलं आहे.

Web Title: Daughter’s suicide with mother’s opposition to love marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here