मुलीची हत्या करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून, वडिलांचा आत्महत्येचा
Pune Murder Case: वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या करून मृतदेह जवळच्या प्रयत्न कॅनॉलमध्ये फेकून देऊन स्वतः विष प्राशन केल्याची घटना.
पुणे : पुण्यात वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या केली, त्यानंतर तीचा मृतदेह (Dead body) जवळच्या कॅनॉलमध्ये फेकून दिला. घरी आल्यानंतर वडिलांनी स्वत : विषप्राशन केलं. त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु सुरु आहेत. त्याचबरोबर कॅनॉलमध्ये मुलीचा फेकलेला मृतदेह पोलिस अग्नीशमक दलाच्या मदतीने शोध घेत आहे. घरगुती भांडणामुळे मुलीच्या वडिलांनी हे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. वडिलांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांच्यासह घरच्यांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.
पुण्यातील पर्वती परिसरामध्ये असणाऱ्या जनता वसाहत येथे पहाटे तीनच्या सुमारास एका 13 वर्षीय मुलीची हत्या करून तिच्या वडिलांनी कॅनलमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना आली. त्यानंतर संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये आरोपी संदीप शिंदे (वडिल) याने मुलीला कॅनलमध्ये फेकून दिल्यानंतर स्वतःने देखील विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुलीचे वडिल संदीप शिंदे याच्यावर सध्या ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. याबाबत मुलीच्या आईने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. वडिलांनी हत्या केलेल्या तनुश्री शिंदे हीचा शोध अग्निशामक दलाच्या जवानांकडून सकाळपासून कॅनलमध्ये घेण्यात येत आहे.
पाच तासाहून अधिक वेळ अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू आहे, मात्र अजूनही मुलीचा तपास लागलेला नाही. स्वारगेट पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृषाली शिंदे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. या मुलीच्या वडिलांचे आणि आईचे विभक्त होण्यासाठीचा वाद काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यानंतर मुलीच्या आजोबांनी तिच्या वडिलांना विभक्त होण्यासाठीची नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला काल रात्री दहाच्या सुमारास आपला बरोबर घरी आणले. पहाटे तीनच्या सुमारास हत्या करून जवळपास असणाऱ्या कॅनॉलमध्ये मुलीला फेकून दिले.
Web Title: Daughter murder and body thrown in canal, father committed suicide
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App