भावाकडून बहिणीसह दाजीची हत्या, रक्तबंबाळ मृतदेह
Nashik Murder Crime: दाम्पत्याचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह.
नाशिक: नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साडगाव शिवारात पारधी दाम्पत्याचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह बुधवारी (दि.६) आढळून आले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करून दोघांचा खून (Murder) करणाऱ्यास अटक केली आहे. शेतजमिनीच्या वादातून मृत वृद्धेच्या सख्या भावाने रविवारी (दि.३) भाऊबीजेच्या दिवशी बहिणीसह दाजीला लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याचे उघडकीस आले आहे.
सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (५०, रा. लाडची शिवार, ता. नाशिक) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. साङगाव येथे रामू राधो पारधी (७०) व चंद्रभागा रामू पारधी (६५) या दोघांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले होते. दोघांना टणक वस्तूने बेदम मारहाण करत जीवे मारल्याचे उघडकीस आले होते. दोघांच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल मिळताच पोलिसांनी तपासास सुरुवात केली. नातलग, गावकऱ्यांकडे तपास केल्यानंतर पोलिसांना संशयित सोमनाथ याच्यावर संशय आला.
त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने दुहेरी खुनाची कबुली दिली. पारधी दाम्पत्यास मूलबाळ नव्हते. त्यामुळे सोमनाथ हा पारधी यांच्या शेतजमिनीत हिस्सा मागत होता.तर चंद्रभागा पारधी या भावाकडे वडिलोपार्जित शेतजमिनीत वाटा मागत होत्या. त्यावरून दोघांमध्ये वाद होते. भाऊबीजेच्या दिवशी संशयित सोमनाथ हा बहीण चंद्रभागाच्या घरी गेला. त्यावेळीही जागेवरून वाद झाल्याने त्याने लाकडी दांड्याने दोघांना बेदम मारहाण करत खून केला. तीन दिवसांनी दोघांचा खून झाल्याचे उघडकीस आले.
संशयित मारेकरी सोमनाथ बेंडकोळी हा दोघांना मारल्यानंतर दोन दिवस बाहेर गेला. त्यानंतर घरी परतला. खुनाच्या तिसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर संशयित सोमनाथ हा घटनास्थळी गेला. जिल्हा रुग्णालयात, अंत्यसंस्कारात सहभागी झाला. तसेच दुःख व्यक्त करून मी काही केलेच नाही या अविर्भावात वावरत होता. मात्र नातलगांच्या चौकशीत सोमनाथबाबत चौकशी केल्यावर ते काहीच बोलत नसल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.
Web Title: Daughter-in-law along with sister killed by brother, bloody bodies
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study