Home अहमदनगर दर्शना पवार खून प्रकरण: तिचा मित्र राहुल हांडोरे सिन्नरचा, कुटुंबही गायब?

दर्शना पवार खून प्रकरण: तिचा मित्र राहुल हांडोरे सिन्नरचा, कुटुंबही गायब?

Darshana Pawar Murder Case:  शवविच्छेदन अहवालाद्वारे दर्शनाची हत्या झाल्याचे समोर आल्यामुळे  दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे संशयाच्या भोवर्‍यात सापडला.

Darshana Pawar Murder Case Rahul Handore Suspected

पुणे:  एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारच्या घातपाती मृत्युमुळे राज्यात  खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालाद्वारे दर्शनाची हत्या झाल्याचे समोर आल्यामुळे  दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे (Rahul  Handore) संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक त्याच्या नाशिक जिल्ह्यातील शाह गावात पोहोचले. पण तिथे त्याच्या घराला कुलूप आहे. त्याचे कुटुंबीय गावात नाही. गत 7-8 दिवसांपासून ते गावात नसल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल हांडोरे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शाह गावचा आहे. त्याने Bsc ची पदवी घेतली आहे. दर्शना व त्याची ओळख पुण्यात झाली. गत काही महिन्यांपासून दर्शना व राहुल एकमेकांच्या चांगल्या संपर्कात आले होते.

याच ओळखीतून दोघे राजगडावर ट्रेकिंगला गेले. तिथे दर्शनाच्या कथित खूनाची घटना घडली. त्यानंतर 2-3 दिवस दोघांचाही पत्ता लागला नाही. त्यामुळे राहुलच्या कुटुंबीयांनी 12 जून रोजी राहुल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

राहुल हांडोरेचे कुटुंब सिन्नरच्या शाह गावात राहते. राहुल गत अनेक वर्षांपासून शिक्षणासाठी बाहेरगावी राहतो. त्यामुळे गावकर्‍यांना त्याच्याविषयी फारशी माहिती नाही. पण कुटुंबीय गावातच राहत असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये तो गावी यायचा. त्याच्या आपल्या गावाशी व गावकर्‍यांशी एवढाच संबंध होता. त्यामुळे राहुलविषयी फार माहिती मिळत नाही.

राहुल हांडोरेचा फोन बंद आहे. त्याचे लोकेशन परराष्ट्रात आढळली आहे. यापुढे त्याचा फोन सुरू झाल्यानंतरच त्याचे खरे लोकेशन कळेल. त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांची 5 पथके तैनात करण्यात आली आहे. ही पथके राहुल हांडोरेचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

Web Title: Darshana Pawar Murder Case Rahul Handore Suspected

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here