पाण्यात वीजप्रवाह उतरला, बैलगाडी गेली, अन दोन्ही बैल कोसळले
Breaking News | Ahmednagar : पाण्यात विद्युतपोलचा वीजप्रवाह उतरलेला होता. बैलगाडी या पाण्यावरून गेली. या विजेचा धक्का बैलगाडीच्या बैलांनाबसला अन ते जागेवरच गतप्राण.
अहमदनगर: शेतातील कामे आटोपून शेतकरी पतिपत्नी सायंकाळी बैलगाडीतून घराकडे निघाले. परंतु रस्त्यात असणाऱ्या पाण्यात विद्युतपोलचा वीजप्रवाह उतरलेला होता. बैलगाडी या पाण्यावरून गेली. या विजेचा धक्का बैलगाडीच्या बैलांना बसला अन ते जागेवरच गतप्राण झाले. परंतु गाडीत बसलेल्या शेतकरी पती पत्नीस काय घडतेय याची कल्पना येताच त्यांनी प्रसंगावधान राखले. पती व पत्नी या दोघांनीही बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना घडलीये जामखेड तालुक्यातील वाघा गावात. शेतकरी सुखदेव बबन बारस्कर व त्यांची पत्नी हे दोघे यातून उड्या मारल्याने बचावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार दि २० जूनला सायंकाळी बारस्कर दाम्पत्य बैलगाडीतून शेतात गेले व दिवसभर शेतातील कामे केली. कामे संपल्यानंतर ते सायंकाळी आपल्या घरी परतत होते. यावेळी पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी होते. बैलगाडीतून घरी येताना वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीज प्रवाह त्या पाण्यात आलेला होता. बैलगाडी या पाण्यावरून जाताच बैलांना विजेचा धक्का बसला. या विजेच्या जोरदार धक्क्याने दोन्हीही बैलाचा जागीच मृत्यू झाला. पती पत्नीस काय होतेय हे समजते न समजते तोच त्यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे यात ते दोघेही बालंबाल बचावले. दरम्यान या घटनेत सदर शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेय. या घटनेचा तातडीने पंचनामा व्हावा व शेतकर्यास आर्थिक मदत द्यावी यासाठी ग्रामस्थ मागणी करत आहेत.
Web Title: current fell into the water, the bullock cart went, and both the bullocks fell
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study