Home संगमनेर संगमनेरातील सीआरपीएफ जवानाचे कर्तव्य बजावत असताना निधन

संगमनेरातील सीआरपीएफ जवानाचे कर्तव्य बजावत असताना निधन

Breaking News | Sangamner:  कर्तव्य बजावत असताना जवानाचे निधन, दिल्ली येथे होते सेवेत.

CRPF jawan dies while on duty

संगमनेर : संगमनेर शहरातील घोडेकरमळा येथील रहिवासी सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर (वय ३८) यांचे दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि. १५) पहाटेच्या सुमारास निधन झाले. सुमारे १७ वर्षापासून ते देशसेवेत होते. त्यांनी छत्तीसगड आणि त्यानंतर दिल्ली येथे सेवा बजावली.

जवान घोडेकर यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने पुणे येथे व त्यानंतर वाहनातून संगमनेरात आणले जाणार असून, अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शहरातील प्रवरा नदीच्या तीरावरील अमरधाममध्ये बुधवारी (दि. १६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजई, पुतणी असा परिवार आहे.

Breaking News: CRPF jawan dies while on duty

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here