राज ठाकरे यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होत नाही: बाळासाहेब थोरात
Sangamner | संगमनेर: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळात आज सायंकाळी होणार आहे. मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी राज्य सरकारला धाडला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये राज यांची तोफ धडाडणार आहे. या सभेसाठी मनसैनिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून हजारोंच्या संख्येने मनसैनिक सभेसाठी पोहचत आहेत. तसेच सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं देखील आहे. विरोधी पक्षाने राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार नाही. असं म्हणत थोरात यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनीच मदभेद सुरू आहेत. मतांची विभागणी करून मतदान मिळवणार्यांना जनता कधीच माफ करणार नाही. जनतेने या राजकारण्याकडे आपली फसवणूक करुन घेवू नये. तसेच राज ठाकरेंच्या सभेला जी गर्दी होतेये ती मतांमध्ये परिवर्तीत होत नाही. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, ही जबाबदारी जो नेता म्हणून मिरवतो त्याची देखील असते असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान राज ठाकरे यांची सभा रात्री आठ वाजता सुरु होणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title: crowd at Raj Thackeray meeting does not turn into votes