Home कर्जत टीईटी घोटाळ्यातील तुकाराम सुपेंकडे सापडली कोट्यवधींची माया, भ्रष्टाचारातून कमावले इतके रुपये

टीईटी घोटाळ्यातील तुकाराम सुपेंकडे सापडली कोट्यवधींची माया, भ्रष्टाचारातून कमावले इतके रुपये

TET scam Tukaram Supe:  ३ कोटी ५९ लाख ९९ हजार रुपये त्यांनी भ्रष्टाचारातून कमावले असल्याचा आरोप.

Crores of wealth found with Tukaram Supe in TET scam

पुणे : टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा (Crime) दाखल केला आहे. ३ कोटी ५९ लाख ९९ हजार रुपये त्यांनी भ्रष्टाचारातून कमावले असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे पैसे १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ दरम्यान कमावले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक  श्रीराम विष्णु शिंदे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांच्या विरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. १९८६ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांनी एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया भ्रष्टाचारातून कामावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्या घरातून दोन कोटी ८७ लाख ९९ हजार रोख रक्कम, १४५ तोळे सोन्याचे दागिने ज्याची किंमत ही ७२ लाख आहे. असे एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या लोकसेवक सेवेच्या कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचं निष्पन्न झाले आहे. म्हणून याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास लाचलुचपतच्या पोलीस अधीक्षक माधुरी भोसले या करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

Web Title: Crores of wealth found with Tukaram Supe in TET scam

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here