Home अहमदनगर तांबे यांनी आधी कॉंग्रेसला मामा बनवलं, आता सुशिक्षित पदवीधरांना मामा बनवत आहे...

तांबे यांनी आधी कॉंग्रेसला मामा बनवलं, आता सुशिक्षित पदवीधरांना मामा बनवत आहे  

Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe; सत्यजीत तांबे यांच्यावर त्यांनी कडवट भाषेत टीका.

criticized Satyajeet Tambe in bitter language

अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी अखेर अहमदनगर शहर काँग्रेसने उघड भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारात सक्रीय होण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एका बैठकीत ही भूमिका जाहीर केली. यावेळी सत्यजीत तांबे यांच्यावर त्यांनी कडवट भाषेत टीका केली. तांबे यांनी गद्दारी करीत आधी काँग्रेसला मामा बनविले आता, पदवीधर मतदारांना मामा बनवून मते मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,’ असल्याची कडवट टीका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.  

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार महविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी शहर काँग्रेस सक्रीय झाली आहे. शहराध्यक्ष काळे यांनी एका बैठकीत तांबे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, नगर शहरातील जनतेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार असणाऱ्या सत्यजित तांबे यांना २९ हजार मते दिली. मात्र, त्यामधील पराभवनंतर ते त्यांच्यासाठी विरोधकांना अंगावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांना शहरातून वाऱ्यावर सोडून गेलेच, मतदारांनाही त्यांनी वाऱ्यावर सोडले. नगरकरांकडे त्यांनी परत कधी ढुंकूनही पाहिले नाही, असा आरोप किरण काळे यांनी केला.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

आताच्या निवडणुकीत काँग्रेसने विश्वासाने दिलेला एबी फॉर्म यांनी गद्दारी करत खिशात घातला. त्यांनी आधी काँग्रेसला मामा बनवलं. आता मतांसाठी ते सुशिक्षित असणाऱ्या पदवीधरांना मामा बनवत आहेत, असा आरोप काळे यांनी केला. राज्यात सध्या गद्दारांचे सरकार आहे. तांबेंना भाजपमध्ये जायचे आहे. ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. भाजपच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणार असे म्हणत यांनी प्रचाराला सुरुवात केली. यांना पाच ही जिल्ह्यांमधून मतदारांनी तोंडावर सांगितले की तुम्ही भाजपचा पाठिंबा घेणार असाल तर आम्हाला गृहीत धरू नका म्हणून यांनी माझ्या श्वासात, रक्तात काँग्रेस असल्याचे म्हणायला सुरुवात केली, असं किरण काळे म्हणाले.

भाजप नेत्यांनी काहीही सांगू मात्र त्या विचारांच्या मतदारांवर, कार्यकर्त्यांवर लादलेल्या या आयात उमेदवारामुळे त्यांनीही आता तांबेंच्या विरोधात भूमिका घेतली आहे, असेही काळे यावेळी म्हणाले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अनिस चुडीवाला, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, शहर काँग्रेस उपाध्यक्ष अशोक शिंदे, सरचिटणीस स्वप्निल पाठक, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा भगत उपस्थित होते.

Web Title: criticized Satyajeet Tambe in bitter language

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here