तू पतीसोबत मुंबईत राहिली तर तुझे तुकडे करून समुद्रात फेकून देईल
Ahmednagar Crime: मुंबईत राहिली तर तुझे तुकडे करून समुद्रात फेकून देईल पहिल्या पत्नीची दुसरीला धमकी : नगरमध्ये पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
अहमदनगर: तू पतीसोबत मुंबईत राहिली तर तुझे तुकडे करून समुद्रात फेकून देईल, अशी धमकी पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला दिली. तसेच पतीनेही दुसऱ्या पत्नीला मारहाण करून घरातून हाकलून दिले. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुंबईतील पीडितेचा पती, सासू, दीर व सवत अशा चारजणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उज्ज्वला सुभाष भदरगे (४५, रा. नालासोपारा, मुंबई, हल्ली रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात होते. फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे, उज्ज्वला यांच्या पहिल्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर त्यांची मैत्रीण राधा साळवे हिने मुंबईतील एका शाळेवर शिक्षक असलेला व्यक्तीशी लग्न करण्यास तयार केले. त्यामुळे १९ जानेवारी २०२२ रोजी सुभाष नामदेव भदरगे (५३, रा. किणी कॉम्प्लेक्स, पालघर) याच्याशी केडगाव येथे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले. त्यानंतर दोघेही नालासोपारा येथे राहावयास गेले. काही दिवसांनंतर दीर निवृत्ती हा शिवीगाळ दमदाटी करू लागला.
सुभाष यास खोटे सांगून मार बसवू लागला. दोन महिन्यानंतर सासू राहीबाईही तेथे रहायास आली. तिनेही छळ सुरु केला. ती उपाशी ठेवू लागली. त्यानंतर पती सुभाष याने पत्नी उज्ज्वला यांना माहेरून पैसे आणावयास सांगितले. पतीच्या सांगण्यावरून आई सुवार्ता पारधे हिचे दागिने मोडून पतीला पैसे दिले. पतीने पहिले लग्न झाल्याचेही लपवून ठेवले होते.
एक दिवस सुभाष याची पहिली पत्नी आयोध्या हिने घरी येऊन तू मुंबईत राहिली तर तुझे तुकडे करून समुद्रात फेकून देईल, अशी धमकी दिली. त्यानंतर सुभाष याने ९ सप्टेंबर २०२२ रोजी घरातून हाकलून दिले. त्यामुळे उज्ज्वला या आईच्या घरी केडगाव येथे आल्या. त्यानंतर अयोध्या हिने पुन्हा फोन करून तू मुंबईला आली तर तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर उज्ज्वला यांनी भरोसा सेलमध्ये तक्रार दिली. तसेच कोतवाली पोलीस ठाण्यातही फिर्याद दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून उज्ज्वला यांचा पती सुभाष नामदेव भदरगे, निवृत्ती नामदेव सासू भदरगे, सासू राईबाई नामदेव भदरगे, सुभाष यांची पहिली पत्नी अयोध्या सुभाष भदरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime stay in Mumbai with your husband, he will cut you into pieces
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App