Home संगमनेर विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध संगमनेरात गुन्हा दाखल

विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध संगमनेरात गुन्हा दाखल

Sangamner Crime: अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करत त्यांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

Crime Sangamnera against the molesting accused

संगमनेर अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करत त्यांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील काही तरुणी सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्लास संपवून गावाकडे जाण्यासाठी संगमनेर बस स्थानकाकडे पायी जात होत्या. शासकीय विश्रामगृह लगतच्या नवरत्न चहा सेंटर समोर या मुली उभ्या होत्या. त्यावेळी चहाच्या दुकानातील एक इसम त्यांच्याकडे पाहून हाताने इशारा करत होता.

त्यामुळे घाबरलेल्या मैत्रिणी तेथून बाजूला जात असताना सदर व्यक्तीने पाठीमागून येऊन एका मुलीचा हात पकडला. घाबरलेल्या या मुलीने हात सोडून तिने व तिच्या मैत्रिणीने आपल्या नातेवाईकांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाल्याने गर्दीतील काही जणांनी आरोपीला पकडून ठेवले होते. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी आदेश राजेंद्र वाडेकर (रा. चास, पिंपळदरी ता. अकोले) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ करीत आहे.

Web Title: Crime Sangamnera against the molesting accused

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here