Home अहमदनगर घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेचा तरुणाने केला विनयभंग

घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेचा तरुणाने केला विनयभंग

Crime News young man molested a woman standing outside the house

अहमदनगर | Ahmednagar| Crime News: सावेडी उपनगरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराबाहेर फोनवर बोलत उभ्या असलेल्या महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सावेडी उपनगरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.  तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय खरात (रा. बिशप लॉयर्ड कॉलनी, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, फिर्यादी महिला मंगळवारी दुपारी तिच्या  घराच्या बाहेर उभ्या राहून फोनवर बोलत असताना जय खरात तेथे आला. त्याने फिर्यादी यांचा हात धरून, तू माझ्यासोबत चल, असे म्हणून गैरवर्तन केले. शिवीगाळ करत घराच्या बाहेरील खुर्चीची तोडफोड करण्यात आली. तसेच फिर्यादी यांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या मुलीस फोन करून वाईट बोलला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक जावेद शेख करीत आहे.

Web Title: Crime News young man molested a woman standing outside the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here