Home अहमदनगर सात वर्षाच्या मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लील कृत्य

सात वर्षाच्या मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लील कृत्य

Crime News Unnatural porn with a seven year old girl

अहमदनगर | Crime News: अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथे राहत असणाऱ्या सात वर्षीय मुलीबरोबर अनैसर्गिक अश्लील कृत्य करणाऱ्या नातेवाईक विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पाथर्डी तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.

बोल्हेगाव येथे हे कुटुंब आहे. मुलीचे वडील खासगी नोकरी करतात. आई ही घरगुती व्यवसाय करत आहे. अल्पवयीन मुलीची आई ही बाहेरून आणलेले कपडे देण्यासाठी संबधित व्यक्तीकडे जात असताना त्यावेळेस पाथर्डी येथील राहणारा नातेवाईक हा घरी आला. त्याने सहज भेटण्यासाठी आलो असे सांगितले.

त्याचवेळेस फिर्यादीने मी आणलेले कपडे घेऊन येते असे संबंधित व्यक्तीला सांगून सदर अल्पवयीन मुलीची आई ही तिच्या लहान मुलासमवेत बाहेर गेल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी ही एकटी होती. आलेल्या या नातेवाईक याने त्या अल्पवयीन मुलीशी अनैसर्गिक अश्लील वर्तन केले.

आई घरी आल्यावर ती मुलगी रडत बसलेली दिसून आली. त्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून तिच्या नातेवाइकाच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस पाथर्डी येथून अटक करण्यात आली आहे.

Web Title: Crime News Unnatural porn with a seven year old girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here