Home अहिल्यानगर दोन भावांनी महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण

दोन भावांनी महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण

Crime News Two brothers molested a woman and beat her in an act that would cause embarrassment

अहमदनगर | Crime News: दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड व आकाश शामसुंदर गायकवाड रा. नागापूर, एमआयडीसी या दोघा भावांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी येथील सन फार्मा चौक येथे विकास गायकवाड याने फिर्यादी महिलेची छेड गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी काढली. हा प्रकार आरोपींच्या घरच्यांना सांगण्यासाठी महिला घरी गेली असता, तेथे असलेल्या विकास व आकाश गायकवाड यांनी तिला शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच गळ्यातील सोन्याच्या मणक्याची पोत तोडून नुकसान करण्यात आले. सदर प्रकार हा त्यांचा मोठा बंधू अंतोन गायकवाड याला सांगितला.

तो लहान भावांना समजावून सांगण्यासाठी आला असता, दोन्ही भावांनी मोठा भाऊ अंतोन यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Crime News Two brothers molested a woman and beat her in an act that would cause embarrassment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here