लग्न केल्याचे भासवून महिलेवर अत्याचार व तिची फसवणूक
श्रीरामपूर | Crime News: एकाने लग्न केल्याचे भासवून एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला व घर घेण्यासाठी २ लाख ८० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. बंटी मोहन आछ्डा याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत महिलने फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार, महिलने बंटी मोहन आछ्डा याच्यावर २ लाख ८० हजाराची फसवणूक व इतर ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. आरोपी बंटी मोहन आछ्डा याने २०१६ पासून राहत्या घरी व अशोक नगर येथील मित्राच्या घरी व अन्य ठिकाणी अत्याचार केला.
एका मंदिरात लग्न केल्याचे भासवून कुठेही वाच्यता न करण्याचे सांगितले. घर खरेदी करण्याचे आमिष दाखवत २ लाख ८० हजार रुपये उकळले. असे महिलेने म्हंटले आहे. पिडीतीचे फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप अधीक्षक राहुल मदने करीत आहे.
Web Title: Crime News Torture and cheating on a woman