धक्कादायक: सासऱ्याने सुनेवर सुरीने केले सपासप वार
चाकण | Crime News: माझ्या घरात कशी राहते असे म्हणत चिडलेल्या सासऱ्याने ३५ वर्षीय सुनेवर लोखंडी सुरीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना खेड तालूक्यातील संतोषनगरला घडली आहे. हल्ला केल्यानंतर दुचाकीहून पळून गेलेला सासरा पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. जखमी झालेली सून आणि सासरा या दोघांवर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना पात्याची सुरी आढळून आली आहे.
राधिका मोरेश्वर येवले वय ३५ रा. संतोषनगर खेड, असे जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. या[याप्रकरणी सासरा पुरुषोत्तम दगडू येवले वय ७५ वर्ष यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सुन राधिका आणि सासरा पुरुषोत्तम यांच्या बऱ्याच दिवसांपासून कौटुंबिक वाद आहेत. राधिकाला घरात राहू द्यायचे नाही या कारणावरून पुरुषोत्तम तिला त्रास देत होता. बुधवारी राधिका सकाळी घरच्या गच्चीवर कपडे वाळत घालत असताना पुरुषोत्तम तिला ठार मारण्याच्या उद्देशाने पाठलाग करीत गच्चीत आला. तिच्या मानेवर, गालावर, हातावर लोखंडी सुरीने सपासप वार केले. या हल्यात राधिका जखमी झाल्या. सासऱ्याच्या तावडीतून सुटत राधिका गच्चीवरून खाली धावत आल्याने तो तिच्या पाठोपाठ आला आणि दुचाकीहून पसार झाला.
Web Title: Crime News The father-in-law stabbed Sune with a knife