संगमनेर तालुक्यात स्पिरीटसदृश्य रसायन जप्त, पाठलाग करत आरोपीस अटक
संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील आश्वी शिबलापूर रस्त्यावर आश्वी पोलिसांनी सुमारे ९८० ली. स्पिरीटसदृश्य रसायनासह एकूण दोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी पाठलाग करीत आरोपीस अटक केली आहे.
शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास आश्वी ते शिबलापूर रस्त्यावर एम.एच. २३ ए.यु. १३८२ हे वाहन संशयास्पद आश्वीकडे येताना रात्रीच्या गस्तीवरून परत येत असलेल्या कॉन्स्टेबल विनोद गंभीरे, शांताराम झोडगे यांना दिसले त्यांनी थांबण्याचा इशारा केला असता पोलीस पाहून आरोपींनी न थांबता पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करीत आश्वी खुर्द शिवारात आरोपी संकेत कुऱ्हाडे व त्याच्या साथीदाराला पकडले. वाहनाची तपासणी केली असता गाडीत दारू बनविण्यासाठी वापरत येणारे ५१ हजार ८०० रुपये किमतीचे ३५ लिटरच्या २८ टंक मध्ये ९८० लिटर स्पिरीट सदृश्य रसायन भरलेले आढळून आले. सुमारे १ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत आश्वी पोलीस स्टेशनाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime News Spirit-like chemicals seized in Sangamner taluka