Home अहमदनगर फेसबुक मैत्री पडली महागात झाले असे काही, तुंम्ही टाळा या गोष्टी

फेसबुक मैत्री पडली महागात झाले असे काही, तुंम्ही टाळा या गोष्टी

Crime News Something that made Facebook friendships expensive

कर्जत | Crime News:  फेसबुक या सोशल मीडियातून ओळख निर्माण करून आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथे नोकरी करणार्‍या कर्मचार्‍यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी  कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

राहुलकुमार श्रीधर राऊत (मुळगाव गडहिंग्लज,कोल्हापुर) सध्या नोकरीनिमित्त (रा.राशीन ता. कर्जत) यांना राहुल नामदेव कवाडे (रा.आवळे बुद्रुक ता.राधानगरी जि. कोल्हापुर) याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर ती रिक्वेस्ट स्वीकारून दोघांमध्ये मैत्री होत चांगले बोलणे व चर्चासत्र सुरु झाले.

मैत्रीचा फायदा घेत कवाडे याने फिर्यादिस मी ट्रेडिंग सुरू केले असुन कोणी गुंतवणूक करणार असेल तर सांगा. १ लाखाला प्रतिदिवसाला मी ५ हजार देतोय आणि रक्कम जेव्हा परत हवी असेल तर पुन्हा लगेच माघारी देखील देतोय’ असे सांगुन मोबाईलवर बँक अकाऊंटबाबतची माहिती पाठवली. तुम्ही २ लाख ३० हजार गुंतवा, मी दररोज २० हजार तुम्हाला देत जाईल व जेंव्हा सर्व रक्कम लागेल तेव्हा परत करेल मी कुणालाही फसवले नाही’  शेअर मार्केटचे अनेक कोर्स मी केलेले असून अनेक अधिकाऱ्यांनीही माझ्याकडे गुंतवणुक केलेली आहे’ असे म्हणत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

यावर विश्वास ठेवत फिर्यादीने दि.३० ऑक्टोबर २०२१ रोजी ४० हजार, दि.१ नोव्हेंबर २०२१ रोजी १ लाख १० हजार तर दि.२ नोव्हेंबर २०२१ रोजी ८० हजार असे एकूण २ लाख ३० हजार रक्कम स्वतःच्या व आईच्या खात्यावरून आरोपीच्या एच.डी.एफ.सी बँक खात्यात ट्रान्सफर केली.

त्यानंतर कवडे याने मोबदला म्हणुन फिर्यादीच्या आईच्या खात्यावर दि.२ नोव्हेंबर रोजी १२ हजार व दि.३ नोव्हेंबरला २० हजार तर दि.८ नोव्हेंबर रोजी २० हजार असे तीन वेळा ५२ हजार रुपये दिले. त्यानंतर मात्र पैसे देण्यास विलंब करून ‘मी शेअर मार्केटचा कोर्स करण्यासाठी पुण्याला जाणार आहे, वडिलांची तब्बेत खराब आहे’ अशी वेगवेगळी कारणे देत पैसे दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Crime News Something that made Facebook friendships expensive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here