एवढंच राहिलं होत, संगमनेरात रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक
संगमनेर | Crime News: देशी दारूची वाहतूक करत असलेली रुग्णवाहिका संगमनेर शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पकडली. गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.
संगमनेर शहरातील बसस्थानकासमोर नाकाबंदी करण्यात आली आहे. तेथून जाणाऱ्या वाहनाची पोलीस तपासणी करीत आहे. तेथून जात असणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी थांबण्याचा इशारा केला. या रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्या रुग्णवाहिकेत देशी दारू आढळून आले. या रुग्णवाहिकेतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कोविड काळात डॉक्टर, पोलीस, नागरिक हैराण झालेले असताना कोण काय करील कशाचा फायदा कोठे घेईल सांगता येत नाही. कोण औषधांचा गैरमार्ग करून काळाबाजार करीत आहेत तर कोण देशी दारूचा धंदा करतांनी दिसून येत आहे.
Web Title: Crime News Sangamner Transport of native liquor by ambulance