संगमनेर शहर पोलिसांची कारवाई, कत्तलखान्यावर छापा, १५०० किलो गोमांस जप्त
संगमनेर |Crime News| Sangamner: संगमनेर शहर पोलिसांनी बेकायदेशिररित्या सुरू असलेल्या भारतनगर कत्तलखान्यावर छापा टाकत कारवाई सोमवारी पहाटे करण्यात आली. यावेळी 1500 किलो गोवंश जातीचे जनावरांचे मांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील भारतनगर येथील अफसर कुरेशी याच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. सदर छाप्यात 3 लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केले मांस आढळून आले. पोलिसांनी सदर मांस जप्त केले आहे.
याबाबत पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्याद दिली असून याप्रकरणी अफसर उमर कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर), अनिस गुलामहैदर कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर), अब्दुलसमद जावेद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहेत.
Web Title: Crime News Sangamner raid on slaughterhouse