संगमनेर: पैसे न दिल्याने आई व लहान भावास मारहाण
संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास आईकडे ५ हजार रुपये मागितल्यानंतर तिने न दिल्याच्या रागातून मोठ्या मुलाने आई व लहान भावास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या मारहाणीत लहान भावाचा पाय मोडला आहे. याप्रकरणी आईने मुलाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कैलास नामदेव कुद्नर वय २५ रा. पिंपळगाव देपा असे गुन्हा दाखल झालेल्या मोठ्या मुलाचे नाव आहे.
आई बायजाबाई नामदेव कुदनर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल नामदेव कुदनर असे जखमी झालेल्या लहान भावाचे नाव आहे.
कैलास कुदनर याने त्याची आई बायजाबाई यांच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी रुपये न दिल्याच्या रागातून त्याने शिवीगाळ केली, नंतर आई व लहान भावास लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण केली. अमोल याचा पाय मोडला आहे. फिर्यादी महिला ही निरक्षर असल्याने हा वाद कौटुंबिक असल्याचे समजून तिने याबाबत कोणाल काही सांगितले नाही. मात्र नातेवाईक यांच्याशी चर्चा करून पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
Web Title: Crime News Sangamner Mother and younger brother beaten