Home क्राईम संगमनेर शहरातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

संगमनेर शहरातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

Crime News sangamner minor girl was lured away

संगमनेर | Crime News: संगमनेर शहरात सय्यदबाबा चौकात बुधवारी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक परिसरातील १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. बुधवारी रात्री ११ ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले. आपली मुलगी घरात नसल्याने तिच्या आईने शोध घेतला. मात्र ती कोठेही आढळून आली नाही.

Job vs Business in Hindi | Business Tips | व्यवसाय से लाखो कमावो, यह व्हिडियो मोटिवेशन

मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले अशी फिर्याद सदर मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहे.

Web Title: Crime News sangamner minor girl was lured away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here