भेळ घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने केला विवाहित महिलेचा विनयभंग
राहुरी | Crime News: भेळ घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने एका ३४ वर्षीय विवाहित महिलेचा पदर धरत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे ६ जुलै रोजी घडली. यावेळी महिलेचा सासरा व पती सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एक विवाहित तरुणी घरात एकटी असताना आरोपी बाळासाहेब सुरेश ताठे रा. क्रांती चौक बारगाव नांदूर हा तिथे भेळ घेण्यासाठी आला असता भेळ घेतल्यानंतर त्याने त्या विवाहित तरुणीकडे पाणी मागितले ती पाणी आणण्यासाठी घरात जात असताना बाळासाहेब ताठे हा अनधिकृतपणे प्रवेश केला आणि घराच्या दरवाजात आडवा उभा राहत तरुणीच्या साडीचा पदर ओढला. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी विवाहित तरुणीने आरडाओरडा केल्याने सासरे हे आरोपीच्या ताब्यातून सोडविण्यासाठी तेथे आले. तेव्हा त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हा प्रकार कुणास सांगितला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच विवाहित तरुणीचा पती आरोपीस समजावून सांगण्यास गेला त्यावेळी आरोपी बाळासाहेब ताठे याने त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी बाळासाहेब ताठे विरोधात विनयभंग, मारहाण व धमकी देणे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहे.
Web Title: Crime News married woman was molested by a customer