ड्रायव्हिंग स्कूलमधील शिकविणाऱ्या चालकाने केला तरुणीचा विनयभंग
जामखेड | Jamkhed | Crime News: चार चाकी वाहन चालवायला शिकवत असणाऱ्या एका ड्रायव्हिंग स्कूलमधील एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामखेड शहरातील ओम ड्रायव्हिंग स्कूलच्या चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. वाहनदेखील पोलिसांनी जप्त केले आहे.
जामखेड शहारत ओम ड्रायव्हिंग स्कूल आहे. येथे मुले, मुली, महिलांना वाहन शिकविले जाते. या स्कूलमध्ये एका तरुणीने प्रवेश घेतला होता. शनिवारी नेहमीप्रमाणे ती तरुणी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ड्रायव्हिंग शिकण्यासाठी आली होती. यावेळी ड्रायव्हिंग स्कूलचा मालक व चालक संदीप झुंबर गर्जे याने तरुणीला ड्रायव्हिंग शिकविण्यासाठी चार चाकी वाहनातून पंचायत समिती ते गौरी हॉटेल जवळील मैदान परिसरात आले. तेथे वाहन चालवायला शिकवत असताना स्टेरिंग पकडण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मालक संदीप झुंबर गर्जे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक राजू थोरात करीत आहे.
Web Title: Crime News Jamkhed young woman was molested by a driver who was teaching in a driving