Home अहमदनगर Crime News: प्रांतधिकारी यांस शिवीगाळ, गुन्हा दाखल

Crime News: प्रांतधिकारी यांस शिवीगाळ, गुन्हा दाखल

Crime news Insulting the governor

कर्जत | Crime News | Karjat: बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी वाळूच्या ट्रकबाबत विचारणा केल्याने रागातून एका व्यक्तीने शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कर्जत मिरजगाव रस्त्यालगत असलेल्या बालाजीनगर परिसरात प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी, तलाठी यांना बोलावून घेतले. त्यांनी शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर पथक बालाजीनगर परिसरात घोलमे यांचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गेले असता तेथे एक ट्रक आढळून आला. या ट्रकमध्ये अंदाजे तीन ब्रास वाळू अवैधरित्या असल्याचे प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांना आढळून आले.

Web Title: Crime news Insulting the governor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here