पती पत्नीला मारहाण तर अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अहमदनगर | Crime News: कामाचे पैसे मागितल्याने पती पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत, त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका उपनगरात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.
याप्रकरणी सदर महिलेने फिर्याद दिली अस्य्न या फिर्यादीवरून गोरख तांदळे व रमेश मांदळे रा. लेखानगर अहमदनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने २३ जून रोजी रमेश तांदळे यास फोन करून कामाचे पैसे मागितले तेव्हा त्याने शिवीगाळ केली होती. त्यांनतर रविवारी रमेशचा भाऊ गोरख याने फिर्यादीच्या घरी येऊन तिच्या मुलीचा विनयभंग करत शिवीगाळ करण्यात आली. तसेच तिच्या पतीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली असे फिर्यादीत म्हंटले आहे.यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे अधिक तपास करीत आहे.
Web Title: Crime News Husband beats wife while molesting minor girl