ग्रामपंचायत सदस्यानी केली पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण
नेवासा | Crime News: नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे ग्रामपंचायत सदस्याने पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.
ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब अशोक घोगरे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी रवी पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी पवार घोगरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेले होते. अधिकाऱ्यांना फोन करत असताना ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब घोगरे हा तेथे आला आणि तो म्हणाला अरे पवार तुला आत्ता जाग आली काय? येथे आमच्या गावातील ग्रामपंचायतीचे दिवे कोणी तरी फोडून जात आहे. तू तेथे पोलीस स्टेशनला झोपा काढतो काय? त्यावर पवार यांनी सभ्यतेने बोलण्याची विनंती केली. मात्र त्याने शिवीगाळ करत पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या अंगावरील गणवेशही फाडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दौलत शिरसाठ व संजय शिंदे यांनी गोगरे यास बाजूला केले. नंतर घोगरे याने तेथून पळ काढला. या घटनेबाबत अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असे फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: Crime News Gram Panchayat member beats up a police