Crime News: अकोले तालुक्यात गावठी दारू पकडली, दोघे जण ताब्यात
अकोले | Crime News: राजूर पोलीस स्टेशन हद्दीत घोटी रोडणे वारंघुशी गावाच्या दिशेने 2 व्यक्ती मो. सा. वर अवैध रित्या गावठी दारू वाहतूक करत आहे. बाबत राजूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांचे पथक वारंघुशी येथे रोड वर वाहने चेक करत असताना समोरून एका मोटरसायकल वर दोन इसम आले. त्यानां पोलीसाची चाहूल लागताच ते पळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना पकडून ताब्यात घेतले त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी संतोष हिरामण घाणे व हरी नंदू कडाळी दोन्ही रा. वारंघुशी असे सांगितले व त्याचे ताब्यातुन
1) 2,000 /- रू किमतीची आंबट उग्र वास येणारी गावठी हातभट्टीची 20 लिटर तयार दारू पांढऱ्या प्लस्टिक ड्रम मद्ये ठेवलेली किंमत अंदाजे.
2) 50,000 /- रू कि. शाईन मॉडेल होंडा कंपनीची मोटार सायकल नंबर एम. एच. 17 बी. क्यू. 3829 असलेली कि. जु.वा.अंदाजे.
एकूण – 52,000/- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यानुसार राजूर पोलीस स्टेशन येथे गु. र. न. 188 /2021 मु. दा.का.65(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई श्री. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, श्री. राहुल मदने, उपविभागीय पोलिस अधिकारी, संगमनेर यांचे मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पो.ना/ दिलीप डगळे , पो ना /पांडुरंग पटेकर ,पो कॉ / विजय फटागरे यांनी केली आहे.
Web Title: Crime News Akole taluka village liquor was seized two persons were arrested