Crime News: संगमनेरात कत्तलखाण्यावर कारवाई, एक कोटीचा मुद्देमाल, ७१ जनावरांची सुटका
संगमनेर | Crime News: गोवंश जनावरांची कत्तल सुरु असलेल्या संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे वाड्यांमध्ये कारवाई करण्यात आली. यावेळी तब्बल ३१ हजार किलो गोमांस व १७ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. यामध्ये सुमारे १ कोटी ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
वाहिद कुरेशी, मुद्दसर हाजी, नवाज कुरेशी, जाहिर कुरेशी, परवेझ कुरेशी सर्व रा. जमजम कॉलनी संगमनेर कलीम सलीम खान रा, मादिरानगर, अबिदुरक अब्दुलजबर रा. कसारा दुमाला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत,
अबिदुरक अब्दुलजबर व कलीम सलीम खान यांना पोलिसांनी अटक केली आहे.
भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतीलाल जैन यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत गोवंश संदर्भात सविस्तर माहिती दिली. संगमनेर उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने रजेवर असल्याने पदभार हा पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे पदभार असल्याने शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात वाड्यांमध्ये जाऊन कारवाई करण्यात आली.
Web Title: Crime News Action on slaughterhouse at Sangamner