अकोलेत ग्रामसेवकास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
अकोले | Crime News: नळ पट्टीचे थकीत पैसे भरणार नाही तुला काय करायचे ते करून घे अशी भूमिका घेत शासकीय कामात अडथळा आणून अरुण गोपीनाथ वालघडे ने ग्रामसेवक रवींद्र सहादू ताजणे यांस दमदाटी, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील केळी ओतूर येथील ग्रामसेवक रवींद्र सहादू ताजने यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिनांक ७ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता फिर्यादी ग्रामसेवक व त्यांचे सहकारी हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शासकीय काम करीत असताना आरोपी अरुण गोपीनाथ वालघडे यांनी नळ पट्टीचे थकीत बिल भरण्याच्या कारणातून ग्रामपंचायत कार्यालयात येऊन मी नळ पट्टीचे थकीत पैसे भरणार नाही. तुला काय करायचे ते करून घे असे म्हणून फिर्यादीस वाईट शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कर्तव्यामध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास साबळे हे करीत आहे.
Web Title: Crime News Abuse of Gram Sevak and death threats