तलाठी पदावर नोकरीचे आमिष देत अकोलेतील तरुणास १८ लाखाला गंडविले
अकोले | Crime News: माझ्या मंत्रालयात व मंत्र्यंशी मोठ्या ओळखी आहेत तुला महसूल विभागात आरक्षित कोट्यातून नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून विश्वास संपादन करत तब्बल १८ लाख ४७ हजार ७०० रुपयांची फसवणूक व पैसे मागितले असता शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अकोले पोलीस ठाण्यात शेखर नंदू वाघमारे वय ३० रा. अकोले यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी नितीन गंगाधर जोंधळे रा. कोकणगाव ता. संगमनेर, विजयकुमार श्रीपती पाटील रा. सिंहगड रोड पुणे असे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्या नातेवाईकांच्या मित्राच्या ओळखीने ओळख झालेले नितीन गंगाधर जोंधळे व विजयकुमार श्रीपती पाटील यांनी मला वेळोवेळी माझी ,मंत्रालयात व मंत्र्यांशी मोठ्या प्रमाणात ओळख आहे. मी अनेकांना सरकारी नोकरीला लावून दिले आहे. जर तुम्ही पैसे दिले तर तुम्हालाही महसूल विभागाच्या आरक्षित कोट्यातून नोकरीस लावून देतो. पैसे दिले तर तुम्हाला तलाठी पदावर नियुक्ती करून देतो असे वारंवार सांगितल्याने नितीन जोंधळे यांनी पैसेची हमी घेतली व व अनेकांना नोकरीस लावल्याचचे आदेश विजयकुमार पाटील यांनी दाखविल्याने विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांनी ३० जुलै २०२० ते १५ मार्च २०२१ या कालावधीत या दोन्ही आरोपीने तलाठी पदासाठी १४ लाख ४५ हजार रुपये रोख व ऑनलाईन ४ लाख २ हजार ७०० रुपये असे एकूण १८ लाख ४७ हजार ७०० रुपये दिले मात्र पैसे देवूनही कोणतेही नियुक्ती पत्र न दिल्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच फिर्यादीने त्यांच्याकडे दिलेले पैसे पुन्हा मागितले असता जोंधळे यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: Crime news 18 lakh to a young man from Akole by offering him a job