Home क्राईम संगमनेर: ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर: ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Sangamner Crime: ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी साकुर येथील दोघांवर गुन्हा दाखल.

Crime has been registered against two in the case of violation of Gram Panchayat Election 

संगमनेर: ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी साकुर येथील दोघांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असताना निवडणूक प्रचाराची सभा घेतल्याने संगमनेर तालुक्यातील साकुर येथील दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साकुर परिसरातील सार्वत्रिक निवडणुका कामी ग्रामपंचायत बिरेवाडी कार्यक्षेत्रात दि. 28/06/22 ते 11/08/22 या काळात निवडणुक प्रचार कालावधी संपले नंतर दि. 03/08/22 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर हनुमंता खेमनर व थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित अशोक खेमनर (दोघे राहणार साकुर, ता. संगमनेर) यांनी बिरेवाडी येथील दुमके वस्तीवर निवडणूक प्रचाराची सभा घेतली. याबाबत वैशाली ढेंबरे व इतर 34 ग्रामस्थ यांनी आचारसंहिता कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रार केली होती.

कक्ष प्रमुखांनी अर्जानुसार लेखी जबाब घेऊन चौकशी केली. त्यानुसार आचारसंहिता भंग झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यानुसार पंचायत समिती विस्तार अधिकारी संजय रामनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 281/2022 भारतीय दंडसंहिता कलम 171 सी उपकलम (1) व लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 126 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ वायाळ हे करीत आहेत.

Web Title: Crime has been registered against two in the case of violation of Gram Panchayat Election 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here