मनसे उपाध्यक्षावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल
Breaking News | Nashik Crime: कामगारांना एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे शहर उपाध्यक्षावर गुन्हा दाखल केल्याची घटना.
सिडको : सिडकोतील प्रभाग २४ मधील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे शहर उपाध्यक्षावर गुन्हा दाखल केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजेंद्र गोरडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सिडकोतील प्रभाग २४ मध्ये हनुमान चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम चालू असताना आदेश खांडरे, प्रतीक साळुंखे, यश निकम, चेतन शेलार, अक्षय खांडरे यांनी कामगारांना दमदाटी केली. पुन्हा काम सुरू करायचे असेल तर एक लाख रुपये देण्याची मागणी केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री. शेवाळे करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Crime has been registered against the MNS Vice President in extortion case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study