Home क्राईम संगमनेर: शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांच्यावर गुन्हा दाखल

संगमनेर: शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांच्यावर गुन्हा दाखल

Sangamner Crime: संगमनेर शिवसेना शहर प्रमुख यांनी बदनामी केल्याने शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल.

Crime has been registered against Shiv Sena city chief Amar Katari

संगमनेर: नगर परिषदेच्या अमरधाम स्मशानभूमीच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी बदनामी केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अमर कतारी यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

अमरधाम स्मशानभूमीच्या कामात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अँड श्रीराम गणपुले यांनी तीस लाख रुपये घेतल्याचा आरोप अमर कतारी यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषद घेऊन केला होता. यानंतर गणपुले यांनी कतारी यांच्या विरोधात फिर्याद दिली. कतारी यांच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल असल्याने त्याचा राग मनात धरून त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरोधात ३०  लाख रुपये घेतल्याचा आरोप केला असे गणपुले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी अमर कतारी यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

Web Title: Crime has been registered against Shiv Sena city chief Amar Katari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here