मारहाण प्रकरणी आमदार लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल
राजूर | Akole: खडकी बुद्रुक ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लाखा बांडे पायी जात असताना आमदार डॉ. किरण लहामटे यांची गाडी कट मारून गेली. यावेळी गाडी हळू चालवा असे ओरडून सांगितल्याने आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केली अशी फिर्याद राजूर पोलीस स्टेशनमध्ये रामदास बांडे यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी आ. लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकी बुद्रुक येथे गुरुवारी साडे बारा वाजेच्या दरम्यान रामदास बांडे दत्त मंदिराजवळ पायी जात असताना त्यांच्या पाठीमागून आ. डॉ. किरण लहामटे यांची गाडी जोरात येऊन कट मारून गेले. यावेळी गाडी हळू चालवा असे ओरडून सांगितले. त्यावेळी आमदारांनी गाडी थांबविली वाहनातून उतरून ‘’ मला ओळखले का? असे म्हणत मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर वाहनात बसून निघून गेले. यावेळी बांडे यांच्यासोबत मनोहर भांगरे होते असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
“ती व्यक्ती दारू पिलेली होती. त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. मी वाहनातून उतरवून रागाविलो. आता तरी सुधारा अशी समज दिली. मात्र एका दारू पिणार्याची बाजू कोणी घेत असेल तर ते राजकारण योग्य नाही. विरोधकांचे बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत. असे कोणी राजकरण करत असेल तर ते चुकीचे आहे. – डॉ. किरण लहामटे”
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Rajur crime has been registered against MLA Kiran Lahamate