प्राध्यापकासह सुरक्षा रक्षकास मारहाण, मुलीशी बोलत असताना हटकल्याने
Ahmednagar Crime: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल : मुलीशी बोलत असताना हटकल्याने आला राग.
नेवासा: मुलीशी बोलत असताना हटकल्याचा राग मनात धरून महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाससह प्राध्यापकाला मारहाण केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्यासह सहा जणांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime
याबाबत प्राध्यापक दशरथ आयनर यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. १६) दुपारी पावणेचारच्या दरम्यान कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गर्दी दिसल्याने सुरक्षारक्षक पाराजी तागड व प्राध्यापक आयनर तेथे गेले होते. त्यावेळी तेथे अनिल माळी व अंकुश ढकलले. शिंदे हे दोघेही होते. त्यावेळी नेवासा- नेवासा फाटा रस्त्याच्या पलीकडील बाजूस पाच-सहा मुले होती.
त्यामध्ये विशाल संजय साठे (रा. काळेगाव, मुकिंदपूर, ता. नेवासा) या कॉलेजचा विद्यार्थीही होता. ती सर्व मुले प्राध्यापक आयनर व सुरक्षारक्षक पाराजी तागड यांच्या जवळ येत तागड यांना शिवीगाळ करू लागली. त्यातील निखिल नावाचा मुलगा तागड यांना म्हणाला, ‘तुझ्या कॉलेजच्या मुलीशी बोलत असताना तू तिला का हटकले? तुझ्याकडे बघतोच,’ अशी धमकी दिली. त्यानंतर प्राध्यापक आयनर यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांच्या श्रीमुखात भडकावली. बाजूला ढकलले. त्यावेळी तिथे असलेले अनिल माळी व अंकुश शिंदे यांना ही त्या मुलांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की करून बाजूला सरले.
त्यानंतर पाराजी तागड यांना मारहाण केली. एकाने रस्त्याच्या पलीकडून एक बांबू आणून तागड यांच्या डोक्यात मारला. त्यावेळी तागड हे जागेवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याने सर्व जण तेथून पळून गेले. त्यानंतर तागड यांना नेवासा फाटा येथे व नंतर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून विशाल साठे, निखिल (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर चार जणांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Crime Filed security guard was assaulted along with a professor
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App